|
शासकीय तंत्र निकेतन, अहमदनगर.
शासकीय तंत्र निकेतन,ही संस्था अहमदनगर ऐतिहासिक शहरात
दिनांक १८/६/१९९० राजी सुरु झाली सुरुवातीस दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले
होते. १.स्थापत्य अभियांत्रिकी २.यंत्र अभियांत्रिकी तसा अहमदनगर शहराचा
औद्योगिक विकास तसा फारसा प्रगतीने झाला नाही शहरास पाणी पुरवठ्याअभावी विकास
झाला नाही. परंतु शासकिय तंत्र निकेतनाची स्थापना झाल्यानंतर ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेणे सोईचे झाले त्यांना शिक्षणापासून वंचित
रहावे लागले नाही.
प्रथम हे तंत्र निकेतनाची सुरूवात भिंगार येथे झाली
त्यावेळेस संस्थेस स्वतःची इमारत नव्हती परंतु त्यावेळच्या मा. प्राचार्यांनी
परिश्रम घेवून अहमदनगर आय.टी.आय. जवळ शासकीयजागा मिळवून घेतली तदनंतर तंत्र
निकेतनाची इमारत सार्वजनिक बांधकाम अहमदनगर यांनी इमारत ही १९९७मध्ये पूण
करून घेतली १९९५ मध्ये उपकरणीकरण अणुविद्युत व दुरसंचार असे दोन अभ्यासक्रम
सूरु झाले.
|
अ.क्र. |
अभ्यासक्रम |
प्रवेश |
शासन निणय
उच्च व तंत्र शिक्षण |
शेरा |
|
०१. |
स्थापत्य अभियांत्रिकी |
६० |
जीटीआय १०९०/५३८९३/१६०३ तंशि-१ब दिनांक १८/८/१९९० |
१९९० पासून अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. |
|
०२ |
यंत्र अभियांत्रिकी |
६० |
जीटीआय १०९०/५३८९३/१६०३ तंशि-१ब दिनांक १८/८/१९९० |
१९९० पासून अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. |
|
०३ |
अणूविद्युत व दुरसंचार |
६० |
जीटीआय ३३९५/६८३८/तंशि-१ दिनांक०७/६/१९९५ |
१९९५ पासून अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. |
|
०४ |
उपकरणीकरण |
४० |
जीटीआय ३३९५/६८३८/तंशि-१ दिनांक ७/६/१९९५ |
१९९५ पासून अभ्यासक्रम सूरु झालेला आहे. |
|
०५ |
संगणक |
६० |
जीटीआय / /तंशि-१दिनांक ७/६/२००५ |
२००५ पासुन अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. |
प्रवेश प्रक्रियाः
इयत्ता १० चा अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर पदविका अभ्यासक्रम प्रवेश
गुणवत्तेच्या आधारे दिला जातो ही महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई
यांच्याशी सलग्न असून परिक्षा ह्या मंडळामार्फत घेतल्या जातात प्रवेश
प्रक्रिया ही १० वीचा निकाल लागल्यानंतर सुरू होते साधारण १५ दिवसांनी प्रवेश
देण्यास सुरूवात होते.
द्वितीय व तृतीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया ही मंडळाच्य़ा निकाल लागल्यानंतर
१५ दिवसाच्या आत पूर्ण केली जाते प्रवेशाच्या वेळी खालील कागदपत्रांची
पूर्तता करावी लागते.
१. प्रथम वर्षासाठी शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, गुणपत्रिका,
उत्पन्नाचा दाखला मागील वर्षाचा, मागील वर्षाचा क्रिमिलीयरचा
दाखला,जातपडताळणी दाखला
२. द्वितीय व तृतीय वर्षासाठी जातीचा दाखला, गुणपत्रिका, उत्पन्नाचा दाखला
मागील वर्षाचा, क्रिमिलीयरचा दाखला, जातपडताळणी दाखला.
तसेच सवलतीसाठी आवश्यक अर्जाची पुर्तता दोन प्रतीत प्रवेशाच्या वेळी करणे
आवश्यक आहे. तदनंतर सवलत न मिळाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही अन्यथा
पूर्ण फी भरूणच तिन्ही वर्षी शिक्षण घ्यावे लागेल.
वसतिगृहः
या संस्थेस मुलांच्या वसतिगृहाची सोय आहे त्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश
दिला जातो वसतिगृमध्ये १६५ मुलांना राहण्याची सोय आहे परंतु मेस ची व्यवस्था
नाही वसतिगृहाची वार्षिक फी ५००/- असून अनामत रक्कम ३००/- अशी आहे.
विद्यार्थी ग्राहक भांडारः
विद्यार्थ्यांना ग्राहक भांडाराचा सभासद होणे आवश्यक आहे. सदर ग्राहक
भांडारातून त्यांना लागणा-या शालेय वस्तु पुरविल्या जातात त्याची फी-------- अशी आहे ग्राहक भांडारातून सर्व प्रकाराचे अर्ज पुरविण्याची सुविदा देणयाचा
मानस आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परिक्षा मंडळ मुंबईः
(फक्त प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी )
पात्रता प्रमाण पत्रः
१) इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी/संस्था बदल विद्यार्थ्यासाठी/थेट
द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी/डबल डिप्लोमा साठी प्रवेश
घेणा-या विद्यार्थ्यांसाठी पात्रता प्रमाणपत्र फी रू, १००/- आहे.
२) नोंदणी फीः नोंदणी फीचे अर्ज मा सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र
शिक्षण परिक्षा मंडळ मुंबई/मा उपसचिव महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परिक्षा
मंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पालन करून भरणे
आवश्यक आहे. नोंदणी फी रू. २१० /- असते तसेच पासपोर्ट आकाराचा कृष्णधवल फोटो
लावणे आवश्यक आहे. त्या सोबत १०वी ची गुणपत्रिका सत्य प्रत जोडणे आवशयक आहे.
३) विषयात सुटः १२ सायन्स/आयटीआय/पूर्ण केल्यानंतर १० वी च्या
गुणाच्या अधारे प्रवेश घेतला असेल त्यांना प्रथम वर्षी CMS (ENGLISH)
PHY/MATH ह्या विषयांना सुट देण्यात येते ते अर्ज साधारण १५/०८/२००७ पर्यंत
भरून देणे आवश्यक आहे.
या संस्थेत थेट द्वितीय वर्षात प्रवेशाची सोय आहे.
१) आय.टी.आय. व १२ वी पास
२) संस्था बदलून मिळते
३) अभ्यालक्रम बदलण्याची सवलत मिळते.
शासकिय तंत्र निकेतन,
अहमदनगर.
|
अ.
क्र. |
शिष्यवृत्तीचे नाव |
अटी
व पात्रता |
लागणारी प्रमुख कागदपत्रे |
शेरा
|
|
०१. |
राष्ट्रीय गुणवत्ता पदवी पर्यंत |
एस एस
सी परिक्षेत किमान गुण ७५ टक्के असावेत या शिष्यवृत्तीचा तीन वर्षासाठी
असतो उत्पन्न मर्यादा रू.३५०००/-च्या आत असावे अशा विद्यार्थ्यांची
निवड एस एस सी बोर्ड निवड करते त्याप्रमाणे फार्म महाविद्यालयात उपलब्ध
होतात आपण ज्या महाविद्याल्यात एस एस सी परिक्षा दिली तेथून अर्ज
घ्यावा. |
विहीत
नमुन्यातील अर्ज गुणपत्रिकेच्या दोन साक्षांकित छायांकित प्रती
उत्पन्न दाखला तहसिलदार यांचे सहीचा |
|
|
०२. |
भारत
सरकारची शिष्यवृत्ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता |
मागासवर्गीय विद्यार्थी/ विद्यार्थींना मार्च/एप्रिल २००६ मध्ये एस एस
सी/प्रथम वर्ष परिक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा या शिष्यवृत्तीचा
लाभ घेता येईल तसेच ही सवलत एकाच कुटूंबातील दोन अपत्यांना मिळू शकते
तसेच मुलींसाठी संस्थेचे बंधन नाही. |
अर्जासोबत १० वी ची साक्षांकित गुणपत्रिका देणे जातीचा दाखला, सक्षम
अधिका-याचा असावा उत्पन्नाचा दाखला सन २००५-२००६ या आर्थिक वर्षाचा
देणे आवशयक आहे.विद्यार्थ्यांचे पालक नोकरीत असल्यास तेथील एकूण
उत्पन्नाचा उदा. मुळ वेतन +
महागाई भत्ता
+
इतर
भत्ते मिळून मिळणारे उत्पन्न तसेच इतर मार्गानी मिळणारे उत्पन्न
.क्रिमिलीयर दाखला देणे आवश्यक आहे. जर शैक्षणिक वर्षात खंड पडला असेल
तर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या सहीचे गॅप सर्टिफिकेट देणे आवश्यक
आहे. तसेच विद्यार्थ्यीनीच्या बाबतीत मुलीचे लग्न झालेले असल्यास
पतीच्या उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी दुस-या
जिल्ह्यातून शिक्षणासाठी आला असल्यास जिल्हा बदल प्रमाणपत्र जोडणे
आवश्यक आहे. |
ज्या
विद्यार्थ्यांनी ११वी व १२वी केल्यानंतर परत १० वी च्या गुणवत्तेच्या
आधारे प्रवेश घेतला असेल त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
त्याने अर्धवट अभ्यालक्रम केला आहे. त्याने अभ्यासक्रम बदल
केल्यामुळे त्याचा लाभ मिळणार नाही यांनी फ्रीशिप साठी अर्ज करणे
आवश्यक आहे.
|
|
अ.
क्र. |
सवलतीचे नाव |
अटी व
पात्रता |
लागणारी प्रमुख कागदपत्रे |
शेरा |
|
०१. |
ईबीसी
आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी |
ज्यांच्या पालकांचे सन २००५-२००६ चे वार्षक उत्पन्न रू. १५०००/- पेक्षा
कमी असून जे गेल्या वार्षिक परिक्षेत पास झाले आहेत ते अर्ज करण्यास
पात्र आहेत अर्ज विद्यार्थ्यांचे वडिल ह्यात नसतील तर आईने भरावयाचा आई
ह्यात नसेल तर पालकांनी भरावयाचा आहे आई,वडिल ह्यात नसतील तर ते ह्यात
नसल्याबद्यलचे गॅझेटेड आफिसर अगर जबाबदार अधिका-याच्या सहीचे निवेदन सादर
करावे सदरची शुल्क सवलत तिस-या अपत्यापर्यंतच मिळते. |
सन
२००५-२००६ च्या खालील व्यक्तींनी सह्या केलेल्या उत्पन्नाचा दाखला
१ शहर
भागासाठी तहशीलदार
२
ग्रामीण भागासाठी तहशीलदार /तलाठी |
|
|
०२ |
प्राथमिक शिक्षकांचे मुलामुलींना मिळणारी शुल्क सवलत पीटोसी |
विद्यार्थी शिक्षकांचा मुलगा /मुलगी असावी तो /ती गेल्या वार्षिक
परिक्षेत उत्तीर्ण असला /असली पाहिजे. |
आई वडिल
ज्या ठिकाणी काम करतात त्यांची नेमणूक करण्या अधिका-याचा ठराविक नमुन्यात
दाखला, गुणपत्रकाच्या ख-या नकला दोन प्रतीत तसेच शिक्षण अधिकारी यांचा
सही व शिक्का असणे आवश्यक आहे. |
|
|
०३. |
माध्यमिक शिक्षकांचे मुलामालींना मिळणारी शुल्क सवलत एसटीसी |
विद्यार्थी शिक्षकांचा मुलगा /मुलगी असावी तो /ती गेल्या वार्षिक
परिक्षेत उत्तीर्ण असला /असली पाहिजे. |
आई वडिल
ज्या ठिकाणी काम करतात त्यांची नेमणूक करण्या अधिका-याचा ठराविक नमुन्यात
दाखला, गुणपत्रकाच्या ख-या नकला दोन प्रतीत तसेच शिक्षण अधिकारी यांचा
सही व शिक्का असणे आवश्यक आहे. |
|
|
०४. |
स्वातंत्र सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत
|
शैक्षणिक हिंद सेना, गोवामुक्ती व भूतपूर्व हैद्राबाद संस्थानात जबाबदार
सरकार स्थापन करण्याबाबत ज्यांनी भाग घेतला अशांच्या मुलामुलींना,
नातवांनाए मुलाचे मुलास, मुलगा मयत झाला असल्यास शुल्क माफी व सवलत
मिळते. अर्ज फक्त नवीन विद्यार्थ्यांनी घ्यावयाचे आहेत गत वर्षी ज्यांनी
ही सवलत घेतली होती त्यांनी प्रगती अहवालाची पूर्तता करावी. |
१
ठराविक नमुन्यात करारनामा
२
सन्मानपत्राची खरी नक्कल
३
उत्पन्नाचा दाखला
४
गुणपत्रकाच्या ख-या नकला
५ मागील
वर्षी शिष्यवृत्ती मिळत नसल्यास तसा संबंधित शाखा प्रमुखाकडून दाखला
आणवा. |
|
|
०५. |
माजी
सैनिकाच्या मुलामुलींना किंवा पत्नीसाठी असणारी शैक्षणिक सवलत |
महाविद्यालयीन सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी |
१ शासकी
दाखला सैनिक
२
गुणपत्रिकाच्या दोन प्रती
३जिल्हा सैनिक बोर्डाचा विहित अर्ज |
|
|
|
|
|
वडिल
ह्यात नसल्यास वडिलांचा मृत्यूचा दाखला आवश्यक आहे. भारत सरकार
मॅटिकोत्तर शिष्यवृत्तीच्या अर्जावर अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो असावा
OBC/SBC/
अपंग/माजी सैनिक जिल्हा समाज अधिकारी अहमदनगर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची
मर्यादा १.४९,०००/-पुर्ण शिष्यवृत्तीस पात्र ६५,२९०/- निर्वाह भत्ता
अर्धा दिला जाईल. फ्रिशिप साठी उत्पन्नाची मर्यादा ३ ६५,२९०/- च्या वर
फ्रिशिपसाठी अर्ज करावेत फक्त
(SC)
शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा १,००.०००/- फ्रिशिफसाठी उत्पन्नाची
मर्यादा
२.
१,००,०००/-च्या वर उत्पन्न असल्यास फ्रिशिफ साठी अर्ज करावेत. |
|
|
०३. |
बी सी
फ्रिशिफ मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी
SC/VJNT/OBC/SBC |
|
वरिलप्रमाणे उत्पन्न मर्यादा १,००,०००/- लाखाच्या वर
(SC)
साठी ६५,२९०/- वर
(VJNT/CBC/SBC) |
|
|
०४. |
भारत
सरकारची शिष्यवृत्ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता
ST |
|
वरिल
प्रमाणे उतपन्न मर्यादा १,००,०००/- |
|
|
०५ |
बी सी
फ्रिशिफ मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी
ST |
|
वरिलप्रमाणे उत्पन्न मर्यादा १,००,०००/- |
|
|
०६.
|
बी डी
कामगार शिष्यवृत्ती |
ज्या
विद्यार्थ्यांचे आई व वडिल बी डी कामगार आहेत अशा विद्यार्थ्यांना अर्ज
भरता येईल.
ATKT
असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार नाही. |
|
|
|
०७ |
अपंग
शिष्यवृत्ती
|
जो
विद्यार्थी ४० टक्के पेक्षा अधिक अपंगत्व आलेले असेल त्यांना अर्ज भरता
येईल उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून उत्पन्न दाखला मा. तहशीलदार
यांच्या सहीचा असावा. |
विहित
नमुन्यतील अर्ज गुणपत्रिकेच्य़ा दोन छायांकित प्रती मा. तहशीलदार यांच्या
सहीचा उत्पन्न दाखला व मुळ प्रत व छायांकित प्रत जिल्हा वेद्यकिय अधिकारी
(जिल्हा शल्य चिकित्सक ) यांचे कडील दिलेले प्रमाणपत्र दोन साक्षांकित
प्रती |
|
सुचनाः
ईबीसी अर्ज माध्यमिक व प्राथमिक शिक्षण माजी सैनिक मागासवर्गीय अनुसाचित
जमाती अर्ज विद्यार्थी ग्राहक भांडार शासकिय तंत्र निकेतन, अहमदनगर यांच्यकडे
उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अन्यथा अर्ज भरून न दिल्यास तिन्ही वर्षी सवलती पासून वंचित राहिल्यास संस्था
जबाबदार राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यवी.
१. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण
विभाग मंत्रालय मुंबई (ईबीसी)
शासन निर्णय क्र. इबीसी
१०९२/१२२१/साशि-५ दिनांक ३०/०३/१९९३
२. महाराष्ट्र शासन शिक्षण व
समाज कल्याण विभाग मंत्रालय मुंबई (पीटीसी)
शासन निर्णय क्र. पीआरई ७०६७ –
एफ/दिनांक १८/०६/१९६८
३. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण
विभाग मंत्रालय मुंबई (एमटीसी)
शासन निर्णय क्र. एफईडी
१०२५/५४७८३/१७७९/९५ साशि – ५ दिनांक ११/०८/१९९५
शिष्यवृत्ती/फ्रिशिफ सवलत
संदर्भः महाराष्ट्र शासन सामाजिक
न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य
विभाग मंत्रालय मुंबई शासन
निर्णय क्र.इबीसी २००३/प्रक ३०१/ मावक – २
दिनांक १/११/२००३
विभाग मंत्रालय मुंबई शासन
निर्णय क्र. इमाव २००२/प्रक ४१४/मावक – ३
दिनांक २९/०५/२००३
विभाग मंत्रालय मुंबई शासन
निर्णय क्र. इबीसी २००३/प्रक २०३/मावक – ३
दिनांक ६/१०/२००३
शिष्यवृत्ती/फ्रिशिफ सवलत
संदर्भः महाराष्ट्र शासन आदिवासी
विकास विभाग
शासन निर्णय क्र. आदिशी
१२०४/पक्र९/क/१२ दिनांक ९/०८/२००४
|